•      
  • - अ      + अ  
  •      
  • क्षमता बांधणी
    क्षमता बांधणी

    ‘गरीबांना गरीबीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा असते’. पंरतु त्यासाठी त्यांना पोषक वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे. हे सुत्र लक्षात घेऊन केंद्र शासनाने दीन दयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरवात केली. या अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी ‘उमेद’ - अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना करण्यात आलेली आहे.

    अभियानामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब व जोखीमप्रवण कुटुंबांना समृध्द , आत्मसन्मानाने व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसावेशक, लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करुन त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा, तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी उमेद मार्फ़त प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये गावांमध्ये गरीब महिलांचे स्वयं सहाय्यता गट, स्वयं सहाय्यता गटांचे ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसंघ व जिल्हा परिषद प्रभाग़स्तरावर प्रभागसंघांची तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक गटांची निर्मिती करण्यात येत आहे. या गरीबांच्या संस्थांना दैंनदिन सुलभिकरणासाठी गावास्तरावर प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्तींची फ़ळी निर्माण करण्यात आलेली आहे.



    क्षमता बांधणीचे उद्देश

    • ग्रामीण भागातील अभियानात सहभाग़ी महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम करणे.

    • कौटुंबिक व समुदायस्तरीय निर्णय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात महिलांचा प्रभावी सहभाग वाढविणे.

    • गरीबांच्या समुदायस्तरीय सर्वसावेशक, लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित संस्थांची निर्मिती करुन त्या संस्था सक्षम करण्यासाठी संस्था व्यवस्थापनाचे कौशल्य विकसित करणे.

    • महिला व संस्थामध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे आणि आर्थिक व्यवस्थापनाचे कौशल्य विकसित करणे.

    • शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे व उपजीविकेतील संभाव्य धोके टाळण्यासाठी रणनिती आखण्याचे कौशल्य विकसित करणे.

    • संवाद, नेतृत्व, लेखा व्यवस्थापन, समन्वय इत्यादी कौशल्य विकसित करणे



    क्षमता बांधणीचे प्रमुख वैशिष्टे

    • समुदाय केंद्रित क्षमता बांधणी धोरण

    • व्यावसायिक व समुदायस्तरीय प्रशिक्षित प्रशिक्षक

    • महिलांना प्रशिक्षक म्हणून काम करण्यास प्रोत्साहन

    • सहभागी पध्दतीने प्रशिक्षण

    • अभियानाच्या २७ मोड्युलव्दारे प्रशिक्षणे

    • समुदाय संचलित प्रशिक्षण केंद्राव्दारे प्रशिक्षणास प्राधान्य

    • क्षमता बांधणीसाठी विविध खेळांचा वापर

    • स्वनुभाव व अनुभव कथनावर भर

    • आदर्श प्रभागसंघांची निर्मिती

    • सातत्याने गरजेनुसार कौशल्य वृध्दीसाठी सुलभिकरण



    क्षमता बांधणीच्या पध्दती

    • प्रशिक्षण • कार्यशाळा • क्षेत्रभेटी /अभ्यास दौरे
    • गटचर्चा • केसस्टडी • अनुभव कथन
    • ऑन जॉब ट्रेनिंग • प्रात्यक्षिकाव्दारे प्रशिक्षण • गटांच्या बैठकामध्ये चर्चा


    क्षमता बांधणीची व्याप्ती

    • मुलभूत प्रशिक्षणे – गट व संस्था व्यवस्थापन

    • आर्थिक व्यवस्थापन

    • आर्थिक साक्षरता

    • लेखे व्यवस्थापन

    • लेखापरीक्षण

    • सुशासन (Governance )

    • दुरदृष्टी विकास व व्यवसाय विकास आराखडा तयार करणे

    • नेतृत्व विकास

    • उपजीविका विषयक प्रशिक्षण

    • प्रशिक्षकांचे प्रशिक्षण



    क्षमता बांधणी कोणाची ?

    • स्वयं सहाय्यता गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ, महिला शेतकरी उत्पादक कंपनी व उत्पादक गटाचे सदस्य व पदाधिकारी

    • राज्य, जिल्हा, तालुका व क्लस्टरस्तरावरील अधिकारी व कर्मचारी

    • सर्व प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्ती

    • राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील प्रशिक्षक /साधन व्यक्ति

    मोड्यूल कोड मोड्युलची माहिती मोड्यूल डाउनलोड करण्यासाठी लिंक
    CRM1 प्रेरिका आणि वर्धिनींसाठी मूलभूत प्रशिक्षण लिंक बघा
    PIP सहभागी पद्धतीने गरीब कुटूंब ओळख प्रक्रिया लिंक बघा
    CDC संसाधन व्यक्ती मूलभूत प्रशिक्षण पुस्तिका लिंक बघा
    उपजीविका विकास उपसमिती उपजीविका विकास उपसमिती भूमिका व जबाबदारी प्रशिक्षण पुस्तिका लिंक बघा
    सामाजिक कृती उपसमिती सामाजिक कृती उपसमिती भूमिका व जबाबदारी प्रशिक्षण पुस्तिका लिंक बघा
    आर्थिक समावेशन उपसमिती आर्थिक समावेशन उपसमिती भूमिका व जबाबदारी प्रशिक्षण पुस्तिका लिंक बघा
    देखरेख व मुल्यांकन उपसमिती देखरेख व मुल्यांकन उपसमिती भूमिका व जबाबदारी प्रशिक्षण पुस्तिका लिंक बघा
    CLF Accountant प्रभागसंघ लेखापाल मूलभूत प्रशिक्षण लिंक बघा
    CLFM1 प्रभागसंघ बांधणी आणि निर्मिती प्रभागसंघाची प्रशिक्षण पुस्तिका १ लिंक बघा
    Vo Sub Committee ग्रामसंघातील सर्व व्यवहारांचे व निर्णय प्रक्रियेचे सनियंत्रण करणे लिंक बघा
    VBKM1 ग्रामसंघ लिपीकेसाठी मूलभूत प्रशिक्षण लिंक बघा
    VM1 ग्रामसंघ सदस्यांसाठी मुलभुत प्रशिक्षण लिंक बघा
    VM2 ग्रामसंघ दृष्टीक्षेप व नियोजन प्रशिक्षण पुस्तिका लिंक बघा
    SBKM1 स्वयं सहाय्यता गट हिशोबनीस मूलभूत प्रशिक्षण लिंक बघा
    SHG Flipchart प्रशिक्षण साहित्य लिंक बघा
    SM1 स्वयंसहाय्यता गटाचे मुलभुत प्रशिक्षण लिंक बघा
    SM2 आर्थिक साक्षरता आणि फिरता निधी लिंक बघा