ग्रामीण भागातील १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) ही योजना सन २००९ मध्ये केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे सुरु करण्यात आली. आरसेटीची संकल्पना ही कर्नाटक येथे श्री. क्षेत्र धर्मस्थळ एज्युकेशन ट्रस्ट यांच्या तर्फे राबविलेल्या (RUDSETI) यावर आधारीत आहे. महाराष्ट्र राज्यात सदर योजेनेची अंमलबजावणी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नत्ती अभियानामार्फत केली जाते. आज रोजी महाराष्ट्र राज्यात एकुण ३५ RSETI व १ RUDSETI आहे. ७ राष्ट्रीयकृत बॅंकांमार्फत सदर योजना राबविली जाते. योजनेकरीता १००% निधी केंद्र शासनामार्फत दिला जातो.
या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील युवकांना किमान १० ते ४५ दिवसांचे कृषिविषयक प्रशिक्षण, उत्पादन विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण व सामान्य उद्योजकता प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे (शेती व बिगर शेती) मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर लाभार्थ्याना उद्योगव्यवसाय सुरु करणेसाठी बॅंकांमार्फत कर्ज पुरवठा मिळविणेसाठी मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण केंद्र चालविण्याची पुर्ण जबाबदारी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा अग्रणी बँकेकडे सोपविण्यात आलेली आहे.
Fill The Below Form and Star Searching