MSRLM ने शेती आणि शेती संलग्न उपजीविका उपक्रम राबविण्यात मोठे यश मिळवले आहे. परंतु त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी MSRLM ने बिगरशेती आणि विपणन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. स्व-उत्पादनांना बाजारपेठ जोडण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या मदतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शेती, शेती संलग्न आणि बिगरशेती उपक्रमात बनवलेली सर्व उत्पादने बाजारपेठेत "UMED" या नावाअंतर्गत ओळखली जातात. हे सर्व साध्य करण्यासाठी अनेक प्रकल्प कार्यक्रमांनी योगदान दिले जे खाली नमूद केले आहेत.
SVEP चे एकंदर उद्दिष्ट ग्रामीण भागात स्वयं रोजगार सुरु करुन आर्थिक चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची अंमलबजावणी करणे. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीबी आणि बेरोजगारी कमी करणे हा आहे.
SVEP (Start-up Village entrepreneurship Program) हा प्रकल्प माननीय वित्तमंत्री केंद्रशासन यांनी ग्रामीण महिलांना उद्योग करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी या प्रकल्पाची घोषणा केली. SVEP या कार्यक्रमांमध्ये उद्योग किंवा व्यवसाय करणारा युवक व नवीन उद्योग चालू करू इच्छिणाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण व व्यवसायासाठी निधी दिला जातो. त्याचबरोबर व्यवसायवृद्धीसाठी देणाऱ्या समूह साधन व्यक्ती निवडून त्यांना प्रशिक्षित केले जाते. तसेच तालुका व्यवसाय साधन केंद्र उभारून ते महिला समूहाद्वारे चालवले जात आहे.
पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि मोहोळ या दोन तालुक्यामध्ये हा प्रकल्प २०१६ मध्ये चालू झाला आहे. सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील ४५०० उद्योगांना सदर योजने अंतर्गत पाठबळ देण्यात आले आहे
राज्यात SVEP प्रकल्प हा चौथ्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर, पालघर जिल्ह्यातील पालघर, यवतमाळ जिल्ह्यातील कळंभ व केळापूर व जालना जिल्ह्यातील जालना व भोकरदन या नवीन 6 तालुक्यात 2019 मध्ये चालू झाले.
AGEY चे मुख्य उद्दिष्ट SHG च्या सदस्यांना DAY - NRLM अंतर्गत सुरक्षित, परवडणारी आणि सामुदायिक देखरेखीखाली ग्रामीण वाहतूक सुविधेद्वारे उपजीविकेचे पर्याय उपलब्ध करून देणे आणि दुर्गम भागांना महत्त्वाच्या सेवा आणि सुविधांनी जोडणे हा आहे. MSRLM ने मार्च 2021 पर्यंत 63 वाहने वितरीत केल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचा फायदा होत आहे. आर्थिक वर्ष 24-25 मध्ये देखील 60 वाहने खरेदीस सहाय्य करण्यात येत आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत नॅनो उद्योगांना पाठबळ मिळण्याकरिता उद्योग विकास केंद्र (OSF) यांची स्थापना करण्यात आली आहे . सदर केंद्रा द्वारे महाराष्ट्रातील 55 तालुक्यातील जुन्या आणी नवीन सूक्ष्म व लघु उद्योगांना ,उद्योग व उद्योजकता विकाससाठी तालुका व प्रभागस्तरावर विविध(वित्तीय /तांत्रिक ) सेवा पुरवण्यात येत आहेत. व्यवसाय जोडणी, बाजारपेठ बांधणी, तांत्रिक सहाय्य इत्यादी बाबतच्यासुविधा ह्या मध्ये समविष्ठा आहे .
सदर सुविधा देण्या करिता २७० BDSP ( Business Development Support Persons), ११०Mentors,९०Facilitators ह्या Cadre ला तयार करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील एकूण १२५७८ उद्योगांना योजना काळामध्येसहकार्य देण्याकरिता निवड करण्यात आली आहे. सदर उद्योगांना पाठबळ देण्याकरिता प्रत्यक OSF करिता निवडलेल्या NODAL CLF च्या OSF खात्यामध्ये रु ५० लक्षइतका निधि वितरित करण्यात आला आहे.सदर प्रकल्पांतर्गत १२५८८ उद्योगांना सहाय्य करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक वर्ष 24-25 मध्ये 15 तालुक्यात नविन OSF कार्यान्वीत करण्यास सहाय्य करण्यात येणार आहे.
NRETP क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत MSRLM मध्ये कोल्हापुरी चप्पल, पैठणी साड्या आणि बंजारा आर्टिक्राफ्ट्स क्लस्टरसाठी संभाव्य उत्पादक गट विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्याचबरोबर कुंभारकाम, कपडे, वारली पेंटिंग आणि सोलर पॅनल्स क्लस्टरसाठी इतर आर्थिक सामंजस्य कराराद्वारे मदतीचा हात देत आहे. हे क्लस्टर महाराष्ट्राच्या कला आणि परंपरांना उजाळा देत आहेत. राज्यात केंद्रशासनामार्फत कोल्हापुरी चप्पल क्लस्टर, जिल्हा कोल्हापूर व बांबू क्लस्टर, जिल्हा लातूर येथे मंजूरी प्राप्त झअलेली असून क्लस्टर उभारणीचे काम करणे सुरु आहे.
MSRLM ने सर्व जिल्ह्यांमध्ये मार्केटिंग आउटलेट्सवर काम केले आहे, ग्रामीण हाटची स्थापना केली, उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्लॉक, जिल्हा आणि राज्य स्तरावर विविध प्रदर्शने आणि सरस आयोजित केले आहे. स्वायम सहायता बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठेत सर्वोत्कृष्ट दर्जा मिळविण्यासाठी उत्पादन विकास आणि उत्पादनांना लागणारे योग्य परवाना देण्याची प्रक्रिया नियमित चालू आहे.स्वयं सहाय्यता समुहातील उत्पादणे विवीध प्रदर्शने, Online offline बाजारपेठेत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच उमेद चे स्वत;चे उमेद मार्ट –Online Ecommerce Platform सुरू करण्यात आलेले असून सदर Online Platform वर सर्व जिल्ह्यातील उत्पादणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत - www.umedmart.com
Fill The Below Form and Star Searching