‘गरीबांना गरीबीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा असते’. पंरतु त्यासाठी त्यांना पोषक वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे. हे सुत्र लक्षात घेऊन केंद्र शासनाने दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरवात केली. या अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी ‘उमेद’- अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना करण्यात आलेली आहे.
अभियानामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब व जोखीम प्रवण कुटुंबांना समृध्द , आत्मसन्मानाने व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसावेशक, लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करुन त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा, तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी उमेद मार्फ़त प्रयत्न करण्यात येत आहेत. या मध्ये गावांमध्ये गरीब महिलांचे स्वयं सहाय्यता गट, स्वयं सहाय्यता गटांचे ग्रामपंचायत स्तरावर ग्राम संघ व जिल्हा परिषद प्रभाग़ स्तरावर प्रभाग संघांची तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक गटांची निर्मिती करण्यात येत आहे. या गरीबांच्या संस्थांना दैंनदिन सुलभिकरणासाठी गावास्तरावर प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्तींची फ़ळी निर्माण करण्यात आलेली आहे.
• ग्रामीण भागातील अभियानात सहभाग़ी महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम करणे.
• कौटुंबिक व समुदाय स्तरीय निर्णय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात महिलांचा प्रभावी सहभाग वाढविणे.
• गरीबांच्या समुदायस्तरीय सर्वसावेशक, लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित संस्थांची निर्मिती करुन त्या संस्था सक्षम करण्यासाठी संस्था व्यवस्थापनाचे कौशल्य विकसित करणे.
• महिला व संस्थामध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे आणि आर्थिक व्यवस्थापनाचे कौशल्य विकसित करणे.
• शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे व उपजीविकेतील संभाव्य धोके टाळण्यासाठी रणनिती आखण्याचे कौशल्य विकसित करणे.
• संवाद, नेतृत्व, लेखाव्यवस्थापन, समन्वयइत्यादीकौशल्यविकसितकरणे
मोड्यूल कोड | मोड्युलची माहिती | मोड्यूल डाउनलोड करण्यासाठी लिंक |
---|---|---|
SM1 | स्वयंसहाय्यता गटाचे मुलभुत प्रशिक्षण | लिंक बघा |
SM1 फिल्पचार्ट | स्वयंसहाय्यता गटाचे मुलभुत प्रशिक्षण | लिंक बघा |
SBKM1 | स्वयंसहाय्यता गटाच्या हिशोबनिसाचे मुलभुत प्रशिक्षण | लिंक बघा |
SM2 | आर्थिक साक्षरता आणि फिरता निधी | लिंक बघा |
VM1 | ग्रामसंघ सदस्यांसाठी मुलभुत प्रशिक्षण | लिंक बघा |
VBKM1 | ग्रामसंघ लिपिकेसाठी मुलभुत प्रशिक्षण | लिंक बघा |
ग्रामसंघ उपसमिती प्रशिक्षण | ग्रामसंघाच्या उपसमितीचे प्रशिक्षण | लिंक बघा |
VM2 | ग्रामसंघाच्या पुढील ५ वर्षाचे नियोजनाची तयारी | लिंक बघा |
ग्रामसंघ व प्रभागसंघ पोस्टर सेट | ग्रामसंघ व प्रभागसंघ रचना | लिंक बघा |
CLFM 1 | प्रभागसंघ सदस्यांसाठी मुलभुत प्रशिक्षण | लिंक बघा |
VO Monitoring Sub Committee | ग्रामसंघातील सर्व व्यवहारांचे व निर्णय प्रक्रियेचे सनियंत्रण करने | लिंक बघा |
Social Audit & Livelihoods Promotion Sub Committee | MIP मध्ये दिलेल्या नियोजननानुसार उत्पन्न, उद्योग साधने व मालमत्ता पाठपुरावा | लिंक बघा |
Bank Linkage Committee | बँकेच्या संदर्भातील कामाचा पाठपुरावा व समन्वय | लिंक बघा |
Social Action Committee | सामाजिक मुद्दे, समस्या विषयी सदस्यांमध्ये जाणीव जागृती, संवेदनशीलता निर्माण करणे | लिंक बघा |
CrM1 | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्तीचे मूलभूत प्रशिक्षण | लिंक बघा |
CTC | समुदायस्तरीय प्रशिक्षकांचे मूलभूत प्रशिक्षण | लिंक बघा |
PIP CRP | निवड करण्यात आलेल्या PIP CIP यांचे प्रशिक्षण | लिंक बघा |
गाव पातळीवर PIP प्रक्रिया | लिंक बघा |
Fill The Below Form and Star Searching