•      
  • - अ      + अ  
  •      
  • कृषीसंबंधित आणि कृषी आधारित उपक्रम
    उपजीविका विभाग -

    कृषीसंबंधित आणि कृषी आधारित उपक्रम



    1. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM)

    कार्यपद्धती:

    ग्रामीण भागातील महिलांची शाश्वत उपजीविका वृद्धिंगत करणेसाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM) या प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत शेती, पशूपालन, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग याकरिता व्यक्तिगत व सामुहिक उपजीविका उपक्रमाच्या विकासातून उत्पन्न वाढीसाठी तांत्रिक मार्गदर्शन व अर्थसहाय्य करण्यात येते.





    2. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प (NRETP)

    १५ जिल्ह्यातील ५५ तालुक्यात कृषी व कृषी संलग्न उद्योग व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी मूल्यवर्धन साखळीमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी उत्पादक गट , महिला शेतकरी उत्पादक कंपनी (FPC/PE) , सेंद्रिय शेतीला चालना देणेसाठी सेंद्रीय शेती प्रभाग स्थापन करून. ग्रामीण कुटुंबांच्या सध्याची उपजिविका बळकट करणेसाठीचे उपक्रम ग्राम संघ , प्रभाग संघ यांचे मार्फत राबविले जातात.


    NRETP प्रकल्प अमलबजावणी समुदाय संस्था :


    एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्प

    ८ जिल्हे, १६ तालुके, ५३ IFC प्रभाग मंजूर आहेत १००% केंद्र पुरस्कृत


    प्रकल्प उद्धीष्ट- जवळच्या २-३ गावातील ३०० कुटुंबे ज्यांच्याकडे २-३ उपजीविका उपक्रमात समाविष्ट आहेत असा एक IFC प्रभाग तयार करणे व वैविध्यपूर्ण उपजीविकेच्या उपक्रमांमध्ये सुधारणा, विस्तार व मूल्य साखळी विकसित करणे.


    योजना / प्रकल्प/ संकल्पना – 3. महिला किसान सशक्तीकरण परियोजना (MKSP)

    प्रकल्पात २० जिल्हयातील १३९ तालुक्यात राबविली जात असून महिलांना शेतकरी दर्जा प्राप्त करून देणे, त्यांना कृषि व पशुपालन विषयक शाश्वत शेती, बकरीपालन, व परसातील कुक्कुटपालन इ. विविध संधी निर्माण करणेसाठी मार्गदर्शन केले जाते. परियोजनेचा कालावधी माहे जून २०१६ ते डिसेंबर २०२२ पर्यंत आहे.

    गाव स्तरावर उपजीविकेचे विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्राम संघ व प्रभाग संघ, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यांना अर्थसहाय्य व कृतीसंगमच्या माध्यमातून शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळवून देण्साठी मार्गदर्शनातून प्रात्यक्षिक प्लॉट तयार करणे,संकलन केंद्र उभारणे ,शेती अवजार बँक स्थापन करणे,महिला शेतकऱ्यांची शेती शाळा घेणे ,विविध संस्थाच्या माध्यमातून महिला शेतकर्याकरिता तांत्रिक प्रशिक्षणासाठी नियाजन करणे इ.उपक्रम राबविले जातात.



    सेंद्रिय शेती उपक्रम

    मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीला चालना देणेसाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM), राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प (NRETP), महिला किसान सशक्तीकरण परियोजना (MKSP) सेंद्रीय शेती प्रभाग समाविष्ट करण्यात आलेले आहेत.अभियानाच्या माध्यमातून २६ जिल्ह्यात २७७ प्रभाग तयार केले आहेत. सध्यस्थितीत २७०० महिला शेतकर्यांची ३००० एकर क्षेत्र PGS Organic प्रमाणित झाले आहे. यासाठी केंद्र शासनाने नेमूण दिलेल्या तांत्रिक सहाय्य संस्थांची मदत घेतली जाते. यामध्ये खालील प्रमाणे कार्यपद्धती चा अवलंब करण्यात येते आहे.





    मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)

    जागतिक बँक अर्थासहाय्यीत स्मार्ट प्रकल्प राज्यात सन २०१९ पासून राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्य ग्रामीणजीवनोन्नती अभियानही एक स्वतंत्र प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा आहे. लहान आणि सिमांत शेतकरी तसेच नव उदयोजकांना केंद्र स्थानी ठेवून शेतमालाच्या सर्व समावेशक आणि स्पर्धात्मक मूल्य साखळीचा विकास करणे हा प्रकल्पाचा मुख्य उदेश आहे.



    कॉल फॉर प्रपोजल–

    यामध्ये प्रक्रिया उद्योग,गोदाम, प्रतवारी यंत्र, शितगृह आदी बाबींचा समावेश आहे. शेतमाल प्रक्रिया उद्योग करिता अधिकतम अनुदान मर्यादा रक्कम २ कोटी आणि फलोत्पादन उद्योग करीता रुपये ३ कोटी अनुदान मर्यादा असून प्रकल्पातुन ६०% आणि समुदाय आधारित संस्थाचा स्वहिस्सा ४०% आहे. या करिता नोंदणीकृत व पात्र प्रभाग संघ / महिला शेतकरी उत्पादक कंपनी याना प्रोतसाहित करण्यात येत आहे.



    ब्रीज टेक्निकल सपोर्ट

    या घटकांतर्गत राज्यातील MSRLM अंतर्गत स्थापन ग्रामीण महिलांचे प्रभाग संघ तसेच मावीम अंतर्गत स्थापन लोक संचालित साधन केंद्र यांच्या ४०० महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे कार्य सुरू असून पुढील २ वर्षात पूर्ण होईल.





    Formation And Promotion of 10,000 Farmer Producer Organizations

    शेतीच्या शाश्वत विकासासाठी आणि कृषी समुदयांच्या सर्वांगीण सामाजिक, आर्थिक विकास आणि कल्याणासाठी (Ministry of of Agriculture & Farmers Welfare) केंद्रशासन निर्देशाप्रमाणे नवीन १०,००० FPOs निर्मिती करण्याचे उदेश आहे.

    सदर प्रकल्प केंद्र पुरस्कृत असून २५ महिला शेतकरी उत्पादक कंपनीला केंद्र शासनाकडून अर्थ सहाय्य होणार आहे. MSRLM- Cluster Based Business Organization म्हणून काम करत आहेत.

    २५ महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांना कार्यक्षम,किफायतशीर आणि शाश्वत संसाधानांच्या वापराद्वारे उत्पादकता वाढवणे, FPO चे व्यवस्थापन,निविष्टा,उत्पादन,प्रक्रिया,मूल्यवर्धन साखळी विकास,मार्केट लिंकेज ,क्रेडिट लिंकेजआणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महिला शेतकऱ्यांमध्ये प्रभावी क्षमता निर्माण केली जात आहे.

    या सर्व बाबींमध्ये FPO निर्मितीच्या वर्षापासून पुढील ५ वर्षांपर्यंत नवीन FPO ला Handholding Support प्रदान करण्यात येणार आहे .