•      
  • - अ      + अ  
  •      
  • कौशल्य
    कौशल्य

    ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणसंस्था(RSETI)

    ग्रामीण भागातील १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींनास्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणसंस्था(RSETI) ही योजना उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मार्फत राबविली जाते. सदर योजनेकरीता १००% निधी केंद्र शासनामार्फत दिला जातो.


    आरसेटी ही योजना सन २००९ मध्ये केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे सुरु करण्यात आली. आरसेटीची संकल्पना ही कर्नाटक येथे श्री. क्षेत्र धर्मस्थळ एज्युकेशनट्रस्ट यांच्यातर्फे राबविलेल्या(RUDSETI) यावरआधारीत आहे.महाराष्ट्र राज्यात एकुण ३४ RSETI व एकRUDSETI आहे. ७ राष्ट्रीयकृत बॅंकांमार्फत सदरRSETI योजना राबविली जाते. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -



    Bank wise RSETIs are as under :
    • • Bank of Baroda – 01
    • • Bank of India - 11
    • • Bank of Maharashtra – 07
    • • Central Bank of India - 06
    • • IDBI – 01
    • • State Bank of India - 08
    • • RUDSETI – 01
    • Total - 35


    या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील युवकांना स्वयंरोजगारासाठी १० ते ४५ दिवसांचे कृषिविषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण व सामान्य उद्योजकता प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे(शेती व बिगर शेती) मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाते.प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर लाभार्थ्याना उद्योगव्यवसाय सुरु करणेसाठी बॅंकांमार्फत कर्ज पुरवठा करणेसाठी सहाय्य केले जाते.प्रशिक्षण केंद्रचालविण्याची पुर्ण जबाबदारी त्या-त्या जिल्ह्यातील Lead Bank कडे सोपविण्यात आलेली आहे.


    सन २०२१-२२ करीता एकुण १८९७२ लाभार्थ्याना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट प्राप्त होते.त्यापैकी १९६०६ लाभार्थ्याना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे आणि एकुण १५२३२ स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.स्वयंरोजगार Self Finance, Bank Finance आणिWage Employment या३ पद्धतीने ग्राह्य धरला जातो.


    सन २०२२-२३ करीता एकुण २७२४२ लाभार्थ्याना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट प्राप्त असून माहे मे २०२२ अखेर एकुण ३०२१ लाभार्थ्याना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.